अजामीळ: भागवतात निर्देशिलेला एक विष्णुभक्त

अजामीळ: ( अजरामर )

भागवतात निर्देशिलेला एक विष्णुभक्त संस्कृतमध्ये त्याचे नाव ‘अजामिल’ असे असून, 

👉तो कान्यकुब्ज देशातील ब्राह्मण होता. 

👉स्वकुटुंबियांचा त्याग करून त्याने शूद्रेशी विवाह केला. 

वयाच्या ८८ व्या वर्षी मरणसमयी यमदूत आले असता, त्याने आपल्या दहा मुलांपैकी धाकट्या नारायणाचे नाव घेतले. 

त्यामुळे विष्णुदूत आले. 

👉अंतकाळी नारायणनामोच्चरणामुळे तो सर्वपापमुक्त झाला असे सांगून, विष्णूदूतांनी त्याला यमदूतांपासून सोडविले.

👉 यमदूत व विष्णुदूत यांच्यातील संवाद ऐकून त्याला उपरती झाली.

👉 सर्वसंगपरित्याग करून तो हरिद्वार येथे जाऊन राहिला व शेवटी त्याला मुक्ती मिळाली. 

👉विष्णुनामोच्चरणाने सर्व पाप नाहीसे होते, ह्या 

👉भागवतधर्मातील तत्त्वाचे अजामीळ हे एक प्राचीन उदाहरण होय.

केळकर, गोविंदशास्त्री

Comments