Posts

Showing posts from August, 2020

अजामीळ: भागवतात निर्देशिलेला एक विष्णुभक्त

अजामीळ:  ( अजरामर ) भागवतात निर्देशिलेला एक विष्णुभक्त संस्कृतमध्ये त्याचे नाव ‘ अजामिल ’ असे असून,  👉तो कान्यकुब्ज देशातील ब्राह्मण होता.  👉 स्वकुटुंबियांचा त्याग करून त्याने शूद्रेशी विवाह केला.  वयाच्या ८८ व्या वर्षी मरणसमयी यमदूत आले असता, त्याने आपल्या दहा मुलांपैकी धाकट्या नारायणाचे नाव घेतले.  त्यामुळे विष्णुदूत आले.  👉अंतकाळी नारायणनामोच्चरणामुळे तो सर्वपापमुक्त झाला असे सांगून, विष्णूदूतांनी त्याला यमदूतांपासून सोडविले. 👉 यमदूत व विष्णुदूत यांच्यातील संवाद ऐकून त्याला उपरती झाली. 👉 सर्वसंगपरित्याग करून तो हरिद्वार येथे जाऊन राहिला व शेवटी त्याला मुक्ती मिळाली.  👉 विष्णुनामोच्चरणाने सर्व पाप नाहीसे होते , ह्या  👉भागवतधर्मातील तत्त्वाचे अजामीळ हे एक प्राचीन उदाहरण होय. केळकर, गोविंदशास्त्री